जिल्ह्यात बँका पतसंस्था, फायनान्सचे कर्ज हप्ते 3 महिन्यासाठी बंद करा-सातारा जिल्हा महिला काँग्रेस यांची मागणी
कुलदीप मोहिते -सातारा
जिल्ह्यातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून बँका पतसंस्था फायनान्स कडून घेतलेल्या कर्जाचा हप्ते किमान 3 महिने थांबविण्यात यावे अशी मागणी आज सातारा जिल्हा महिला काँग्रेसचा माध्यमातून महिलांनी सातारचे खासदार श्री श्रीनिवास पाटील यांचा कडे केली आहे
सध्या सातारा जिल्ह्यात 15 एप्रिल पासून लॉक डाऊन सुरू असून आता याला जवळपास 45 दिवस पूर्ण होत आहेत गरिबांचा हाताला काम नाही,व्यवसाय बंद,काम बंद या परीस्थितीत दोन वेळची भाकरी मुश्किलीने मिळत आहे अश्या वेळी बँकां पतसंस्था, फायनान्स चे हप्ते कसे भरणार,फायनान्स मधून बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाचा हप्त्या साठी महिलांना वसुली पथकाकडून त्रास दिला जात आहे या पतसंस्था बँक आणि फायनान्स चे हप्ते किमान तीन महिने बंद करावेत आणि वसुली थांबवावी या आशयाचे निवेदन आज सातारा जिल्हा महिला काँग्रेस चा माध्यमातून महिलांनी खासदार श्रीनिवास पाटील आणि जिल्हाधिकरी शेखर सिंह यांच्या कडे दिले आहे