सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात लग्न समारंभावर कारवाई;ग्रामपंचायतीने 50000 चा दंड केला वसूल
प्रतीक मिसाळ -सातारा
जावळी तालुक्यातील कुसुंबी या गावात गावातीलच एक कुटुंबातील सदस्यांनी विवाह सोहळा आयोजित केला होता.विवाह सोहळ्यास 50 लोकांची मर्यादा असताना तिथे 100 हुन अधिक लोक आढळून आले,तसेच तिथे बरेच लोक विना मास्क वावरताना आढळून आले.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने व जिल्हाप्रशासनाने घातलेल्या निर्बंधाचे उल्लंघन केल्या प्रकरणी ग्रामपंचायतीने त्यांना 50000 हजाराचा दंड आकारून वसूल करण्यात आला.यापुढेही असे निर्बंध तोडनार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे,असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.