कर्जत पोलिसांना सामाजिक संस्थेने केली जेवणाची सोय
दिनेश हरपुडे-कर्जत
सामाजिक अपराध नियंत्रण आणि भ्रष्टाचार विरोधी संस्था ,यांच्यावतीने कर्जत येथील चार फाटा,दहीवली (श्रीराम पुल)तसेच कडाव आणि कशेळे येथे पोलिस अधिकारी(कर्मचारी) यांना जेवणाची,पाण्याची सोय करण्यात आली.सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच ही संस्था सामजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, यांच्या मार्गदर्शनाने, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर शितोळे यांच्या वतीने, रायगड जिल्हा सदस्य सुप्रेश साळोखे , कर्जत तालुका उपाध्यक्ष रतन लोंगळे, सेल अध्यक्ष शांताराम मिरकुटे,सोशल मीडिया अध्यक्ष सचिन भगत, प्रसिद्धी प्रमुख मोतीराम पादिर, पंकज म्हसे, रमेश ताकसांडे यांनी कर्जत तालुक्यातील पोलीस नाकेबंदी ठिकाणी जेवण व पाण्याची सोय करण्यात आली...
..