कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक काढा वाटप..४०० कुटुंबांनी घेतला लाभ
दत्तात्रय शेडगे-खोपोली
देशात कोरोंना आजाराने हाहाकार माजवला असून आताची दुसरी लाट भयंकर असून या आजारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे याची दखल घेत कै आनंदभाऊ शिंगाडे युवा प्रतिष्ठान रामनगर लोणावळा आणि लोकविशेष फाउंडेशन व चोपडा कॉर्नर यांच्या वतीने आज लोणावळ्यातील रामनगर येथील कुटूंबाना कोरोना आजारावर मात करण्यासाठी आणि शरीरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढापॅकेट वाटप करण्यात आला
हा आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेला आयुष् नावाचा काढा असून यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास मदत होऊन कोरोना आजारावर मात करू शकतो यासाठी आज रामनगर येथील सुमारे 400 कुटूंबाना हा काढा चे पॅकेट वाटप करण्यात आले ,हा काढा बनवून देण्यासाठी लोकविशेष फाउंडेशन आणि चोपडा कॉर्नरचे विशाल चोपडा, शीतल चोपडा, अमित चनाल, अक्षय चनाल यांनी विशेष मेहनत घेतली,