चिपळूणातील साईधाम मित्र मंडळाने कोरोना रुग्णांच्या मृतांसाठी उपलब्ध करून दिली १२ टन जळाऊ लाकडे
ओंकार रेळेकर-चिपळूण
कोरोनाने हाहाकार माजवला असून दुसरीकडे मृत्यूंची संख्या देखील चिंताजनक आहे. अंत्यसंस्कासासाठी मृतदेह वेटींगवर राहत असल्याचे चित्र देखील आहे. तसेच लाकडांचादेखील तुटवडा जाणवत आहे. ही परिस्थिती चिपळुनातदेखील आहे. ही बाब लक्षात घेऊन साईधाम मित्रमंडळ, बाजारपेठ, चिपळूण या मंडळाने कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रामतीर्थ स्मशानभूमीला १२ टन लाकडांची व्यवस्था केली आहे.
कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असून कोरोनाबाधित मृत्यूची संख्यादेखील चिंताजनक बनली. आहे. चिपळुनात तर बेड मिळेनासे झाले आहेत. याच बरोबर कोरोना बाधित मृत्यूचा आकडा देखील २०० च्या जवळपास पोहोचला आहे. कोरोना बाधित मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मृतदेह च्या अंत्यसंस्कारासाठी वेटिंगवर राहण्याची वेळ येत आहे याचबरोबर लाकडाचा तुटवडा देखील जाणवत आहे ही बाब लक्षात घेऊन साईराम मित्र मंडळ बाजारपेठ चिपळूण तर्फे करून आणि मूर्त झालेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी रामतीर्थ स्मशानभूमी ला 12 टन लाकडाची व्यवस्था केली आहे या उपक्रमाच्या माध्यमातून या मंडळाने थोडाफार हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे