कोल्हापुरातील गिरगाव मधील सैनिकाचा ऑक्सीजन अभावी तडफडुन मृत्यू
भिमराव कांबळे -कोल्हापुर
कोल्हापुर मध्ये गिरगाव येथील सर्जेराव कुरणे या मा.सैनिकाचा ऑक्सिजन अभावी तडफडुन मृत्यू झाल्याची घटना रंकाळा परिसरातील महालक्ष्मी हॉस्पिटल येथे घडली आहे.दि.२६ रोजी सदर रुग्ण या हॉस्पिटल मध्ये अँडमिट झाला होता,आज हॉस्पिटल मधील ऑक्सिजन संपल्याने १ तासाहून अधिक काळ ऑक्सिजन पुरवठा सुरळीत न झाल्याने रुग्णाचा तडफडुन मृत्यू झाला.कोल्हापुर मध्ये सगळीकडे सुरळीत ऑक्सिजन पुरवठा आहे असे सांगितले असता ऑक्सिजन अभावी मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे