गोकुळ निवडणुकीत मंत्र्याकडुन कोविड नियमांना हरताळ
भीमराव कांबळे -कोल्हापुर
गोकुळ दुध संघाची निवडणूक निवडणूक आयोगाच्या नियोजित कार्यक्रमानुसार होत आहे;पण सदर निवडणूकीत कामगारमंत्री हसन मुश्रीफ ,गृहराज्यमंत्री सतेज पाटील व विरोधक यांनी राज्य शासनाच्या कोविड नियमांना पायदळी तुडवुन केराची टोपली दाखवली आहे.सोशल डिस्टेंन्शीगचा फज्जा उडाला आहे.मतदानानंतर फोफावणा-या कोविड परिस्थितीस जबाबदार कोण? सामान्य नागरीकांवर कारवाईचा बडगा उगारणारे प्रशासन आता कोणती कारवाई करणार याकडे सामान्य नागरिकांचे लक्ष.