Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भिलवडीत लसीकरणावेळी हाणामारी : पोलिस अधिकाऱ्यांनी केली ज्येष्ठ नागरीकांना अर्वाच्च भाषा .

 भिलवडीत लसीकरणावेळी हाणामारी : पोलिस अधिकाऱ्यांनी केली ज्येष्ठ नागरीकांना अर्वाच्च भाषा 

सुधीर पाटील -सांगली




भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोनाच्या पहिल्या व दुसरया लसीकरणासाठी आलेल्या जेष्ठ नागरीकांनी मोठी गर्दी केली.पहाटे चार वाजल्या पासून जेष्ठ नागरीकांनी लसीकरणासाठी नंबर लावला होता . परंतु आप्पत्ती व्यवस्थापनांने पहाटेपासून आलेल्यांची नंबरप्रमाणे यादी तयार केली होती . परंतु ही यादी आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे दोन वेळा फाडण्यात आली . २८ एप्रिल पासून लसीचा तुटवडा असून ४५ वयोगटातील लसीकरण अद्याप पुर्ण नाही . तर पहिला डोस घेतलेल्यांची पंधरा दिवस झाले तरी  दुसरया डोसचा पत्ता नाही . केवळ १४६ च डोस आले असल्याने दोनशेहुन अधिक नागरीकांनी गर्दी केली होती .

पहाटे पासून ताटकळत बसलेले जेष्ठ नागरिक आरोग्य विभागाच्या नियोजन शुन्य कारभारावर नारजी व्यक्त करीत घरी निघुन गेले . प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोठी गर्दी झाल्याने सोशल डिस्टटिंगचा पुरता फज्जा उडाला होता . यावेळी नागरीकांच्यात नंबर लावण्यावरून  प्रारंभी चौकटीतच हाणामारी झाली . तर आरोग्य कर्मचारी वर्गाकडून जेष्ठ नागरीकांना धक्काबुक्की करण्यात आली . तर डॉक्टरांच्याकडून जेष्ठ नागरीकांना धुडकावुन लावण्यात आलं. पोलिस अधिकाऱ्यांनी जेष्ठ नागरीकांना अर्वाच्य भाषा वापरल्याने जेष्ठ नागरीकांतुन नाराजीचा सुर घटना ठिकाणी उमठत होता . या पोलिस अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांना कोणत्याही कारणांवरून वारंवार अश्लील शिवीगाळी होत असल्याची चर्चा परिसरात होत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies