राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महागाई आणि भाव वाढीचा निषेध
केंद्र सरकारच्या विरोधात कडाव येथे केलं आंदोलन
-नरेश कोळंबे-कर्जत
केंद्र सरकारने ऐन पावसाळ्यात शेतीच्या कामाची सुरुवात करण्याआधी शेतीपयोगी वस्तूंची दरवाढ केली तसेच जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवले आहेत या गोष्टींचा निषेध करत कडाव येथे राष्ट्रवादीचे खासदार श्री सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
वाढती महागाई आणि केलेली भाववाढ याने सध्या संपूर्ण जग हादरले असून घरात पैश्याची चणचण असताना केंद्र सरकार कडून अनेक वस्तूंचे भाव वाढवले जात आहेत. गेल्या वर्षी खाद्यतेलांच्या भावात 1600 रुपयांनी वाढ करत आज ते 2800 रू झाले आहे, गॅस 900 च्या घरात जाऊन पोहचली आहे, पेट्रोल कमी करू म्हणताना ते शंभरी पार नेले , शेतिपयोगी असणारी खते यांच्या भावातही कमालीची वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत. या सर्व गोष्टींच्या भाव वाढीचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस कडून सर्व ठिकाणी करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे कडा व शाखेच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी कोरोना संसर्गाची काळजी घेत एकदम कमी माणसांत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी तालुकाध्यक्ष अशोक भोपतराव , उपसरपंच हर्षद अशोक भोपतराव ,ज्येष्ठ कार्यकर्ते अशपाक कर्णेकर, सदस्य सुभाष शिंदे,पुष्पा काळोखे , मानसी काळोखे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अर्केश काळोखे, महेश देवघरे असे कार्यकर्ते उपस्थित होते.
वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, केंद्र सरकारने महागाई कमी करू ह्याचं दिलेलं आश्वासन पाण्यात विरल्याचे चित्र आहे. घरगुती गॅस हजारावर गेला आहे, पेट्रोल शंभरी पार झाला आहे , ह्या गोष्टींकडे केंद्र सरकार डोळेझाक करत असून भरमसाठ वाढ ह्या कोरोना काळात करत आहे आणि त्यामुळे गरीब जनतेचे ह्या महागाईने कंबरडे मोडले आहे. म्हणून आम्ही ह्या केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयांचा निषेध केला आहे.
अशोक भोपतराव ( राष्ट्रवादी काँग्रेस, तालुकाध्यक्ष )