Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आरोग्य सेवकांचे कार्य अनमोल- प्राचार्य डॉ श्रीनिवास जोशी

 आरोग्य सेवकांचे कार्य अनमोल- प्राचार्य डॉ श्रीनिवास जोशी

-बोर्ली पंचतन मध्ये आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी यांचा सन्मान

- गोखले कॉलेज व शिवम मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार

अमोल चांदोरकर - श्रीवर्धन



सुरू असलेल्या विश्वव्यापी कोरोना महामारीमध्ये आरोग्य सेवकांचे कार्य अनमोल असून त्यांचे ऋण न फेडता येणारे आहेत असे प्रतिपादन गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालय श्रीवर्धन चे प्राचार्य डॉ श्रीनिवास जोशी यांनी केले. बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शिवम मेडिकल स्टोअर्स व गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने बोर्ली पंचतन येथील आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी यांचा ते कोरोना महामारीमध्ये करीत असलेल्या कार्याचा गौरव करण्याकरिता आयोजित छोटेखानी कृतज्ञता सोहळा प्रसंगी केले. 



   सध्या सपुंर्ण विश्व कोरोनाच्या संसर्गाने व्यापले आहे कित्येक संसार ह्या कोरोनाने उद्धवस्त केली आहेत, भारतामध्ये सध्या कोरोनाचा दुसऱ्या लाटेने हाहाकार माजविला आहे त्यातच आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने जनता भयभीत आहे. या सुरु असलेल्या कोरोना संकटामध्ये डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्य सेवक, आशा सेविका, पोलीस कर्मचारी व इतरही काम करणारे प्रशासन वर्ग घेत असलेली मेहनत यामुळे अनेकांना खूप दिलासा मिळत आहे. यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली पंचतन येथे शिवम मेडिकल स्टोअर्स व गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने बोर्ली पंचतन येथील आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी यांचा ते कोरोना महामारीमध्ये करीत असलेल्या कार्याचा गौरव करण्याकरिता आयोजित छोटेखानी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते 



याप्रसंगी दिघी सागरी  पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप पोमाण, गोखले एज्यु, सोसायटीच्या श्रीवर्धन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीनिवास जोशी, उपप्राचार्य  निलेश चव्हाण, समनव्यक न म बापट, वैद्यकीय अधिकारी डॉ सूरज तडवी, डॉ सौ तांबे, डॉ सौ सुजाता बापट, सरपंच नम्रता गाणेकर, उपसरपंच प्रकाश तोंडलेकर, शिवम मेडिकल स्टोअर्स संचालक समीर सुर्वे, नितीन सुर्वे, प्रा किशोर लहारे, वाल्मिक जोंधळे, प्रा. संजीव खोपकर त्याचप्रमाणे आरोग्यसेवक, आशा सेविका, पोलीस कर्मचारी , पत्रकार उपस्थित होते यावेळी उपस्थित परिचारिका, आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी, आशा सेविका यांचा सॅनिटायझर्स, मास्क आदी वाटू देऊन गौरव करण्यात आला. यावेळी आपल्या मनोगतामध्ये दिघी सागरी  पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक संदीप पोमाण म्हणाले की,  ह्या कोरोना महामारीमध्ये जवळची नाती दुरावली असताना  सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवक, पोलीस कर्मचारी जीवाची बाजी लावीत कोरोना महामारीमध्ये काम करीत आहेत आज होत असलेल्या या सन्मानामुळे सर्वांना कार्य करण्याची उत्तम प्रेरणा व ऊर्जा मिळेल. नागरिकांनी देखील आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले तर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालय श्रीवर्धन चे प्राचार्य डॉ श्रीनिवास जोशी म्हणाले की, कोरोनापुढे सर्वच जग हतबल झालेले दिसत आहे, सर्व क्षेत्र बंद पडली आहेत, अर्थ व्यवस्थेला देखील याचा जबरदस्त फटका बसला आहे. यामध्ये आपल्या जवळची माणसे जवळ येऊ शकत नाही, यामध्ये आरोग्य सेवकांचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही त्यांचे कार्य अतुलनीय आहे  ते करीत असलेल्या कार्याचे कोणिही ऋण फरडू शकत नाही असे म्हणाले. यावेळी उपसरपंच प्रकाश तोंडलेकर, शिवम मेडिकल संचालक नितीन सुर्वे यांचे देखील समयोचित मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies