वाकडी येथे करण्यात आली जंतुनाशक (सॅनिटायझर) फवारणी.
ज्ञानेश्वर काकडे-भोकरदन
वाकडी व कुकडी मध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोना या रोगाने अतिशय थैमान घातले असून एक दिवस आड मृतांची संख्या वाढत आहे या कारणास्तव ग्रामपंचायत स्तरावरून गावामध्ये सर्वत्र जंतुनाशक (सॅनिटायझर) ची फवारणी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत माध्यमातून दररोज सकाळी तसेच रात्री अलॉसटमेंट करून सर्व नागरिकांना तसेच दुकानदार व्यापारी यांना व फळभाज्या विक्रेत्यांना सतर्क करून मास्क तसेच सॅनिटायझर यांचा वापर करून आपण सोशल डिस्टन पळून तुरळक ठिकाणी राहून सात ते अकरा या वेळेत आपला व्यवसाय करून दुकाने बंद करावेत असे निर्देश ग्रामपंचायत स्तरावरून देण्यात आले आहे व काही नागरिक या गोष्टीकडे स्वतः जातीने लक्ष घालत नसल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय यांच्या नियमाचे पूर्णपणे काटेकोर पालन होत नसल्याने रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे सरपंच नितीन पाटील देवकर तसेच ग्रामसेवक एस.आर.सपकाळ त्यांच्या म्हटल्यानुसार लोकांना दंड आकारणी करूनही या गोष्टी लक्षात येत नसल्याचे म्हटले आहे.