चिंचवली येथे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
आरोग्य,क्रीडा व शिक्षण सभापती सुधाकर घारे यांच्या हस्ते झाले उद्घाटन
नरेश कोळंबे -कर्जत
कर्जत तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मध्ये लसीकरण मोहीम जोमाने सुरू असून सर्वच ठिकाणी लोक लसी साठी आपल्या घरातील लोकांना नेऊन लसीकरण साठी नोंदणी व लसीकरण करून घेत आहेत परंतु असं असूनही बऱ्याच ठिकाणी लसीकरण साठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. याचं साठी तसेच गावातील प्रत्येकाचे लसीकरण कमी वेळात व्हावे , म्हणून आणखी उपकेंद्र खुली केली . यावेळी रा. जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा व शिक्षण सभापती सुधाकर घारे यांनी कर्जत तालुक्यातील चिंचवली या उपकेंद्रात लसीकरण मोहीम हाती घेत लसीकरणाचा शुभारंभ उद्घाटनानंतर केला.
कर्जत तालुक्यात 6 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत व या केंद्रात लसीकरण मोहीम चालू असून सुध्दा सर्व लोकांना लस घेणे ह्या कमी आरोग्य केंद्रात शक्य होत नसल्याने मागील काही दिवसांपासून रा. जि. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य क्रीडा व शिक्षण सभापती सुधाकर घारे यांनी तालुक्यातील 30 उपकेंद्र लसीकरणासाठी उपलब्ध करून देण्याचे ठरविले होते. त्यातील 26 उपकेंद्र ह्या काही दिवसांत चालू सुध्दा झाले आहेत. तसेच आज त्यातीलच एक चिंचवली ग्रामपंचायत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करत शुभारंभ केला. यावेळी कर्जत पंचायत समिती माजी सभापती प्रदीप ठाकरे, भाजप चे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनिल गोगटे , कर्जत पंचायत समिती बी.डी. ओ राजपूत साहेब, गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड , मंगेश म्हसकर , सुजाताताई मनवे, तालुका आरोग्य अधिकारी सी.के.मोरे, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, सागर शेळके, राजेश भगत,संतोष थोरवे हृषीकेश भगत, धनंजय थोरवे, तसेच चिंचवली सरपंच सुनीता आहिर ,उपसरपंच दिपाली कांबरी आणि शाळेतील शिक्षक वृंद आदी लोक उपस्थित होते.
तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण चालू असून त्यात वाढ करत आपण जवळ जवळ 26 उपकेंद्र सुध्दा लसीकरणासाठी सज्ज केलेले आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी पुढाकार घेऊन सर्व लोकांपर्यंत पोचून त्यांना लसीकरण बद्दल माहिती द्यायला हवी व सर्वांचे लसीकरण करायला हवे आहे. गावातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचणे गरजेचे आहे. काही आरोग्य केंद्रात लसीकरण धीम्या गतीने सुरू असून अशा भागात अधिकारी वर्गाने फिरून लोकांचे प्रश्न समजून त्यांना लसीकरणासाठी तयार केले पाहिजे. गावातील प्रत्येक शेवटच्या व्यक्ती पर्यंत लसीचा लाभ मिळाला पाहिजे.