कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कारवाईत ३१ लाख रुपये दंडाची आकारणी...
भिमराव कांबळे -कोल्हापुर
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीच्या काळात नियम मोडणाऱ्यांवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतींन कारवाई करण्यात आली. गेल्या वीस दिवसात १३८७ वाहन जप्त करत ३१ लाख रुपये दंडाची आकारणी केली आहे. अशी माहिती शहर वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी दिली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले. यामध्ये अनावश्यक फिरणाऱ्यांवर, गर्दी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना सकाळी ११ नंतर घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आलं. तरी देखील अनेकजण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत होती. अशांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं गेल्या वीस दिवसात कारवाई करत १३८७ वाहने जप्त केली. तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या जवळपास पंधरा हजार वाहन चालकांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वीस दिवसात जवळपास ३१ लाख रुपये दंडाची आकारणी झाली आहे.
कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कारवाईत ३१ लाख रुपये दंडाची आकारणी...
5/05/2021 08:00:00 AM
0