गर्दी का केली विचारल म्हणून जमावाने पोलिसावर केला हल्ला
जमावाने दगडफेक करत चेकनाक्याचीही केळी तोडफोड
गजानन गायकवाड-पुणे
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलिसांनी गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाने थेट पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. संगमनेर शहरातील दिल्ली
नाका परिसरात हा प्रकार घडला. सध्या याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे