गारपीट झालेल्या भागात आमदार किसन कथोरे यांचा पहाणी दौरा
सुधाकर वाघ-मुरबाड
मुरबाड तालुक्यातील गारपीट झालेल्या भागास आमदार किसन कथोरे यांनी भेट देऊन आढावा घेतला . याप्रकरणी शासन दरबारी पाठपुरावा करून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळून देण्यास आपण स्वतः प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार कथोरे यांनी नुकसानग्रस्तांना दिले आहे .
मुरबाड तालुक्यातील मेर्दी ग्रामपंचायतीच्या हद्दीत रविवारी सायंकाळी वादळी वारा आणि गारांचा जोरदार पाऊस पडला . या पावसात गारांचा दोन फुटांचा खच पडला होता . या गारपिटीमुळे आदिवासी बांधवांच्या घरांचे व जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार कथोरे यांनी सोमवारी या भागाला भेट देऊन येथील परिस्थितीची पाहणी केली . या वेळी तहसीलदार अमोल कदम ,मुरबाड पंचायत समितीचे सभापती दीपक पवार , उपसभापती अरुणा खाकर , जि.प. सदस्य गोविंद भला , पंचायत समिती सदस्य सीमा घरत आदी उपस्थित होते .