सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञातांकडून दगडफेक
मराठा आरक्षण रद्दचे साताऱ्यात तीव्र पडसाद
प्रतीक मिसाळ- सातारा
सातारा-गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका सातारा येथील निवासस्थाना बाहेर शेणीच्या गोवऱ्या पेटवल्याचा खळबळजनक प्रकार घडला असून त्यानंतर लगेचच सातारा येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे . मराठा आरक्षण रद्द केल्याचे सातारा शहरात पडसाद पहायला मिळाले.
आज सकाळी 10 चा सुमारास सातारा येथील राष्ट्रवादी पार्टी कार्यालय येथे अज्ञात 4 ते 5 इस्मानी दगडफेक करून पोबारा झाली येथील राष्ट्रवादी कार्यालयाचा बंद असलेल्या गेट चा भिंतीवर चढून सकाळी 10 चा सुमारास अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटना समजताच राष्ट्रवादी नेते आ. शशिकांत शिंदे हे तातडीने कार्यालयात दाखल झाले त्यांच्या सोबत तेजस शिंदे,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,पोलीस उपअधीक्षक आंचल दलाल आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते ही जमा झाले होते. आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याचे आवाहन केले.तसेच राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक ही घटना दुर्दैवी आहे . येत्या 24 तासांच्या आत आरोपींना अटक करावी .
कोणीही राजकारण करू नये . आमचा राष्ट्रवादी पक्ष मराठ्यांच्या सोबत नेहमीच आहे . कालही होता , आजही आहे आणि उद्याही असणार आहे . भाजपाची भूमिका मराठा आरक्षणाची नाही . कालच याचिककर्ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व राज्य सरकार यांच्यावर मराठा आरक्षणांसाठी खापर फोडत होते . काहीजण प्रत्येक गोष्टीत राजकारण करून वातावरण दूषित करण्याचे काम करत आहे . भाजप केवळ जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याचे आ . शशिकांत शिंदे असल्याचा आरोप केला .या संपूर्ण घटनेने साताऱ्यात खळबळ माजली असून पोलिसांनी प्रचंड प्रमाणात बंदोबस्तात वाढ केली आहे.