कराड येथील जेष्ठ पत्रकार शशिकांत महाजन यांचे कोरोनामुळे निधन
कुलदीप मोहिते-कराड
कराड येथील जेष्ठ पत्रकार आणि लिंगायत समाजातील कार्यकर्ते शशिकांत महाजन यांचे कोरोना मुळे काल निधन झाले , गेली 40 वर्षे त्यांनी कराड,पुणे येथे विविध वृत्तपत्रा मध्ये काम केले कराड पत्रकार संघाच्या स्थापने मध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे पत्रकारिते सोबत त्यांनी सामाजिक कार्यात ही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती , मृत्यू समयी त्यांचे वय 60 वर्षे होते. त्यांचे निधनाचे वृत्तांने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे , त्यांचे मागे 3 भाऊ ,1 बहीण ,पत्नी आणि 1 मुलगा असा परिवार आहे. महाराष्ट्र मिरर परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली