निमणी येथे तहसीलदार व बी .डी.ओ .यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उदघाटन
सुधीर पाटील-सांगली
निमणी नेहरूनगर व परिसरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणे वाढत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे .पॉझिटिव्ह पेशंट घरी राहिल्यामुळे संपूर्ण कुटुंबच कोरोना पॉझिटिव्ह बनू लागले . त्यामुळे निमणी व नेहरूनगर मध्ये रुग्ण संख्या झपाट्याने वाढली गेली . हे लक्षात घेऊन निमणी व नेहरूनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा निमणी येथे तीस | बेडचे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले . यावेळी प्रकाश यादव यांनी सर्वरूग्णांना ब्लॅकेट वाटप केलेयाचे उदघाटन तहसीलदार कल्पना ढवळे बि.डी.ओ दीपा बापट यांच्या हस्ते संपन्न झाले
.यावेळी सरपंच विजय पाटील नेहरूनगर सरपंच यादव ,पोलीस पाटील सतीश पाटील उपसरपंच दिनकर पाटील नेहरूनगर चे पोलीस पाटील वाघमारे ,डॉक्टर दीपक पाटील , संतोष सावंत, शरद पाटील , ऋतुराज जगदाळे ,आप्पासाहेब पाटील ,बंडू माने ,गणेश पवार ,उदय पाटील व ग्रामसेवक, तलाठी ,ग्रामपंचायत चे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते .