अखेर साताऱ्यात सापडले म्युकर मायकोसिसचे रुग्ण
सहा रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण
प्रतीक मिसाळ-सातारा
सातारा जिल्ह्याला एकीकडे करोना महामारी ने हाहाकार माजवला असतानाच आता करोना पश्चात म्युकर मायक्रोसिस चे सहा रुग्ण साताऱ्यात आढळले आहेत . यापैकी तिघांवर पुण्यात तिघांवर साताऱ्यात उपचार सुरू झाले आहेत .एका बुरशीमुळे होणारा संसर्ग ने अनेकांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे .मागील फेब्रुवारी महिन्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येऊन धडकली वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते दुसऱ्या लाटेत करोना मुक्त झालेल्यांमध्ये डोळे आणि नाक कान मध्ये होणाऱ्या संसर्गाच्या तक्रारीत वाढ झाली आहे . डोळ्याला सूज , नाकाला सूज , डोळे लाल होणे अशी सुरुवात लक्षणे आढळतात . मधुमेह असलेल्या रुग्णांना हा आजार लवकर संभवतो आहे . आजार वाढल्यास मेंदृपर्यंत जाऊन रुग्णाच्या जीवावर बेतू शकते असा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे . सातारा येथील प्रतिभा हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात सुनील गोगावले , सचिन साळुखे आणि शिवाजीराव जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत . या हॉस्पिटलचे डॉ . फडतरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की , बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला म्युकर मयकॉसिस म्हणतात करोना झालेल्या काही रुग्णांना हा आजार संभवतो डोळे आणि नाकाला इन्फेक्शन होते , प्रसंगी काही जणांना आपला डोळा देखील गमवावा लागला आहे , या आजाराचे रुग्ण सर्वत्र वाढत आहेत , रुग्णांनी आजाराची लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे . बुरशीचा संसर्गाचा धोका अनेकांना असतो .सायनस मध्ये नाका भोवती असलेल्या मोकळ्या जागेत बुरशी साठून राहते ही बुरशी हवेतून ज्या व्यक्तीला त्याचा संसर्ग झाला आहे अशा व्यक्तीकडून दुसऱ्याला संसर्ग होण्याची शक्यता असते रोगप्रतिकारशक्ती चांगली असलेल्यांना यांचा त्रास होत नाही . पण ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्यासाठी ही बुरशी घातक आहे.करोना रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि त्यामुळे या संसर्गाला सायन्स मध्ये शिरण्यास वाव मिळतो आणि ज्यामुळे संसर्ग पसरतो मधुमेही रुग्णांची संख्या करोना च्या दुसऱ्या लाटेत जास्त आहे तज्ञांच्या मते मधुमेहींच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी असून या संसर्गाचे प्रमुख कारण आहे . या आजारांमध्ये नाकातून रक्त येणे , मेंदूत संसर्ग झाल्यास तीव्र डोकेदुखी , एखादी गोष्ट डबल दिसू लागते अशी ही लक्षणे आढळतात .तरी अशी लक्षणे दिसून आल्यास जास्त दिवस अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे तज्ज्ञांनी आवाहन केले आहे.