शिळफाट्याजवळ ट्रकने दिली कारला जोरदार धडक ..
दोन जण जागीच ठार..एक जण जखमी
ट्रक आणि कारचाही चक्काचूर
दत्तात्रय शेडगे-खालापूर
मुबंई पुणे जुन्या महामार्गावरून पुण्याहून मुबंई कडे सिमेंटघेऊन जाणार ट्रकचा शिलफाटा जवळील पटेल नगर येथे आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रकने समोरील कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात दोन जण जागीच ठार तर एक जण जखमी झाले असून ट्रक आणि कारचाही चक्काचूर झाला आहे
ट्रक एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट वरून जुन्या महामार्गाने खोपोलीकडे जात असताना शिलफाटा जवळील पटेल नगर येथील उतारावर आला असता त्याचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने ट्रक मधून उडी मारली तर ट्रक ने समोरील कारला जोरदार धडक देऊन ट्रक पलटी झाला यात ट्रक चालक आणि पादचारी अश्या दोघांचा जागीच मृत्यू झाला क्लिनर जखमी झाला आहे तर यात ट्रक आणि कारचाही चक्काचूर झाला