लसीकरण नोंदणी करण्यासाठी तरुण सरसावले पुढे.
राम जळकोटे-तुळजापूर
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता प्रादुर्भाव पाहता यातच सर्वत्र दि.१ मे पासून १८ वर्षापुढील ते ४५ वय असणाऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात येत आहे.यामध्ये ऑनलाईन नोंदणी च्या बाबतीत अनेक चुका अथवा ऑनलाईन नोंदणी जमत नसेल अश्यांना किलज मधल्या या तरुणांनी आपण या कोरोनाच्या काळात यांसाठी आपल्या माध्यमातून लसीकरण नोंदणी करून देऊ असा निर्धार केला. आणि या किलज मधल्या तरुण युवकांनी ४ जणांची टीम बनवून त्या द्वारे गावातील सर्वाना ज्यांना लसीकरण ऑनलाईन करणे जमत नसेल त्यांना करून देऊ असे आवाहन केले आहे.गावातील अनेक व्हाट्सअप्प ग्रुप च्या माध्यमातून तसेच लोकांना जनजागृती च्या माध्यमातून असे आवाहन करण्यात येत आहे.या कठीण काळात कोरोनाचा धोका वाढत असताना अनेकांनी ही लस घेतली असून या लसीचा निकाल योग्य पध्दतीने असल्याचे सांगण्यात येत आहे.यात गावातील सर्व लोकांनी हे लसीकरण करून घ्यायला हवे यासाठी या तरुणांनी ही धडपड सुरू केली आहे.यामध्ये प्रदीप शिंदे, विकी शिंदे, किरण शिंदे, वैभव मर्डे हे तरुण युवक सध्या हे सामाजिक बांधिलकी राखत हे काम करत आहेत.