Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कोरोना बाधितांचे प्रमाण 10 टक्याच्या आत आल्यामुळे निर्बंध शिथिल

 कोरोना बाधितांचे प्रमाण 10 टक्याच्या आत आल्यामुळे निर्बंध शिथिल 

  • नागरिकांनी गाफिल राहून गर्दी करु नये  पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

प्रतीक मिसाळ -सातारा



 जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे बाधित होण्याचे प्रमाण 10 टक्क्याच्या आत आल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनला शिथीलता दिली आहे . नागरिकांनी गाफील न राहता बाजारपेठेमध्ये गर्दी करु नये , प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन स्वत : ला व दुसऱ्यांना कोरोनाचा प्रादुभार्व होणार नाही याची खरबदारी घ्यावी , असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले . जिल्ह्यातील कोरोना संदर्भातला आढावा पालकमंत्री श्री . पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला . यावेळी त्यांनी जनतेला आवाहन केले . या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह , मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , पोलीस अधीक्षक अयजकुमार बन्सल , अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे , निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . सुभाष चव्हाण , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते . प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर , सुरक्षित अंतर पाळले पाहिजे व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे , असे आवाहन करुन पालकमंत्री श्री . पाटील पुढे म्हणाले , जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या कमी झाली आहे . कुणीही कोरोना गेला , असे समजू नये प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे . लग्न समारंभामध्ये मास्कचा वापर केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे . तसेच लग्न समारंभात फोटो काढताना मास्क घालत नाहीत यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे . लग्न समारंभातील उपस्थितांनी मास्कचा वापर करावा , असे आवाहनही पालकमंत्री श्री . पाटील यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies