औंध जिल्हा परिषद गटातील विकासकामासाठी 5 कोटीचा निधी मंजूर . गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी
गावागावात आनंदाचे वातावरण
संदीप फडतरे- माण
औंध जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामासाठी उपमुख्यमंत्री ना . अजित पवार यांच्या माध्यमातून लेखाशिर्ष 2515 मधून सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली . गायत्रीदेवी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की औंध जिल्हा परिषद गटातील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी गावअंतर्गत विकासकामासाठी निधी देण्याची मागणी केली आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला होता . गावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विकासकामासाठी 2515 लेखाशिर्ष मधून पाच कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे . जिल्हा परिषद गटातील कामाची यादी आणि मंजुर झालेला निधी पुढीलप्रमाणे नांदोशी गावांतर्गत रस्ते आणि गटार बांधणे 20 लक्ष , उंबर्डे ते कुमठे भाग ग्रा.प.ते वडूज कराड रस्ता तयार करणे 10 लक्ष , वरुड ते साळुखे वस्ती रस्ता तयार करणे 10 लक्ष , सिध्देश्वर कुरोली ते धकटवाडी रस्ता तयार करणे 15 लक्ष , भुरकवडी ते धकटवाडी रस्ता तयार करणे 20 लक्ष , सिध्देश्वर कुरोली येथील रानमळा फाटा ते बनसोडे वस्ती रस्ता तयार करणे 10 लक्ष , उंबर्डे ते बाळूबाई मंदीराकडे जाणारा रस्ता तयार करणे 20 लक्ष , उंबर्डे येथे ग्रामसचिवालय बांधणे 20 लक्ष , जायगांव गावअंतर्गत रस्ते आणि गटर बांधणे 30 लक्ष , गोसाव्याचीवाडी गाव अंतर्गत रस्ते आणि गटर बांधणे 10 लक्ष , अंबवडे गावांतर्गत रस्ते आणि गटर बांधणे 15 लक्ष , गोपूज गावांतर्गत रस्ते आणि गटर बांधणे 10 लक्ष , नायकाचीवाडी गावांतर्गत रस्ते आणि गटर बांधणे 10 लक्ष , सिध्देश्वर कुरोली येथील ग्रामपंचायत मिळकत नंबर 255 मधील बहुउद्देशीय सभागृहाची सुधारणा आणि सुशोभीकरण करणे 15 लक्ष , लोणी ते धकटवाडी रस्ता तयार करणे 10 लक्ष , नढवळ गावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष , भोसरे गावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष , खबालवाडी गावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष , वरुड गावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष , गुरसाळे गावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष , लोणीगावांतर्गत रस्ता आणि गटर बांधणे 10 लक्ष , औंध येथील मूळपीठ देवीकडे जाणारा रस्ता तयार करणे 42 लाख रुपये , औंध गावांतर्गत रस्ते करणे 90 लक्ष , औंध गावांतर्गत आर सी सी गटर बांधणे 45 लक्ष , औंध येथील जुने एस टी स्टँड येथील व्यापारी संकुल दुरुस्ती करणे 38 लक्ष रुपये . वरील प्रमाणे मंजूर विकासकामे स्थानिक पातळीवर ग्रामस्थांना बरोबर घेऊन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत . काही गावांना आता विकासकामासासाठी निधी उपलब्ध झाला नसला तरी पुढील टप्प्यात त्या गावासाठी प्राधान्याने निधी देण्यात येईल . औंध जिल्हा परिषद गटातील गावांच्या अडीअडचणी आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही गायत्रीदेवी यांनी दिली आहे .