आर टी इ अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करा:दादासाहेब ओव्हाळ
प्रतीक मिसाळ सातारा
सातारा आरटीई अंतर्गत प्रत्येक शाळांना शासनाने 25 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे हा गुन्हा आहे गरिबांना मागासवर्गीयांना व अल्प उत्पन्न धारकां च्या विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत करण्यात हा कायदा करण्यात आला साताऱ्यातील काही मग्रूर शिक्षण सम्राटांनी आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे निवेदन दिला आहे त्याचा सर्वप्रथम रिपाई सातारा च्या माध्यमातून आम्ही निषेध करतो तसेच सदर संस्थाचालकांना तंबी देऊन त्यांना शासनाच्या आदेशाप्रमाणे राहून प्रवेश देण्याचे बंधनकारक करा अन्यथा जे कुणी आरटीई अंतर्गत प्रवेश नाकारतील अशा संस्थांचे मान्यता रद्द करा, कोरोना च्या काळामध्ये अनेक जण आर्थिक विवेचनाला सामोरे जात आहेत तसेच शासनाचे आदेश मानत आहेत अशा वेळेस या मग्रूर शिक्षण सम्राटांनी आर टी ई या शासनाच्या आदेशाचे पायमल्ली करण्याचे व मानण्याचे धोरण अवलंबून आहे ते चुकीचे आहे एकंदरीत अशा लोकांवर ती गुन्हे दाखल होणे सुद्धा गरजेचे आहे आणि त्यासाठी येणाऱ्या काळात राईट टू एज्युकेशन याकरता अनेक विद्यार्थ्यांसाठी ज्यांना आरटीई कायद्याच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देता येतं अशा पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या हितासाठी रिपब्लिकन पक्ष ए रस्त्यावर उतरून आंदोलन करेल व संबंधित शिक्षणाधिकारी ,शिक्षण संचालक यांना संबंधित मग्रुर शिक्षण सम्राटांनी वरती गुन्हे दाखल करण्यासाठी प्रवृत्त करू संबंधित संस्थांच्या मान्यता रद्द कराव्या व वेळ प्रसंगी आक्रमक रित्या आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल ... असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ रिपब्लिकन जिल्हाध्यक्ष किरण ओव्हाळ तसेच रिपब्लिकन युवक कार्याध्यक्ष विक्रम वाघमारे तालुका अध्यक्ष दीपक गाडे शहराध्यक्ष जयवंत कांबळे युवक उपाध्यक्ष सोमनाथ धोत्रे तालुका संघटक भिकाजी सावंत संध्या भिशे वर्षा दौंडकर सुषमा भिसे इत्यादी दिला आहे.