Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कर्जत -खालापूरमध्ये धरण ,धबधब्यांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

 कर्जत -खालापूरमध्ये धरण ,धबधब्यांवर प्रतिबंधात्मक आदेश जारी

कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी काढले आदेश

आदित्य दळवी
महाराष्ट्र मिरर टीम



पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक हे धबधबे किंवा तलावाच्या ठिकाणी येत असून जीवितहानी होण्याच्या घटना घडत आहेत.त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच यावर्षी धबधबा, धरण व तलाव या क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होवू नये याकरिता हे प्रतिबंधात्मक(कलम 144)आदेश प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी जारी केले आहेत.हे आदेश 9 जून ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत लागू असतील.सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाण्याच्या प्रवाहात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे.
कर्जत उपविभागात येणाऱ्या कर्जत आणि खालापूरमधील एकूण 23 ठिकाणी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.



कुठकुठली धरणे आणि धबधबे आणि तालुका

कर्जत तालुका

  • आषाणे कोषाणे धबधबा
  • सोलनपाडा धरण
  • पळसदरी धरण
  • कोंढाणे धरण/धबधबा
  • पाली भुतीवली धरण
  • नेरळ जुमापट्टी धबधबा
  • बेडीसगाव धबधबा
  • पाषाणे तलाव
  • बेकरे धबधबा
  • आनंदवाडी धबधबा
  • टपालवाडी धबधबा 

खालापूर तालुका

  • झेनिथ धबधबा
  • आडोशी धबधबा व परिसर
  • आडोशी तलाव
  • बोरगाव धबधबा
  • भिलवले धरण
  • मोरबे डॅम
  • नढाळ/वरोसे धरण
  • वावर्ले धरण
  • माडप धबधबा 
  • धामणी धबधबा
  • कलोते धरण

       कशावर आहे प्रतिबंध!

  1. पावसामुळे निर्माण झालेले धबधबे परिसरात मद्य करण्यास,व विक्री करणे आणि मद्यधुंद अवस्थेत असणे
  1. सेल्फी अगर चित्रीकरण करणे
  1. धोकादायक ठिकाणी वाहन थांबवणं
  1. वाहन वेगाने चालवणं,वाहतुकीस अडथळा आणण किंवा धोकादायक स्थितीत ओव्हर टेक करणं
  1. सार्वजनिक ठिकाणी केरकचरा करणं
  1. महिलांची छेडछाड करणे,टिंगलटवाळी करणे,असभ्य वर्तन आणि अश्लील हावभाव करणं,लज्जा निर्माण होईल असं कोणतंही कृत्य
  1. सार्वजनिक ठिकाणी डीजे मोठया आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे
  1. जल, वायू,ध्वनी प्रदूषण करणे
  1. कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात असल्याने सोशल डिस्टन्सिंग पालन होणे आवश्यक आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies