देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन
प्रियांका ढम - पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वकांक्षी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवायचा असा निश्चय यावेळी करण्यात आला. यावेळी लोणी काळभोर व कदम वाक वस्ती शहरांमध्ये पक्षाची वाटचाल, ध्येय धोरणं ,भविष्यातील आव्हाने व संघटनात्मक रचना याविषयी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष श्री प्रवीण नाना काळभोर यांनी अनमोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक नंदू काका काळभोर, पंचायत समितीचे विद्यमान सदस्य अनिल शेठ टिळेकर, लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेशजी काळभोर, कदमवाक वस्ती शहराध्यक्ष विशालजी गुजर, हवेली तालुका ओबीसी अध्यक्ष नितीनजी टिळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विशालजी वेदपाठक , विश्वजीत पवार, मंगेशजी काळभोर, सुनील जी शर्मा, करण पवार, मल्हार पांडे, प्रदीप गुजर, जगन्नाथजी लांडगे, हनुमंत तुपसमिंद्र, शैलेश तावरे हवेली तालुका महिला उपाध्यक्ष सविता ताई वर्मा , नीलम ताई गव्हाणे व इतर मान्यवर उपस्थित होते.