Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

माथेरानची मिनी बस सुरू

 "अखेर यशवंती धावली"

माथेरानची मिनी बस सुरू

चंद्रकांत सुतार---माथेरान



मार्च महिन्या पासून लॉकडाऊन  सुरू झाले  त्या नंतर कोविड पासून सुरक्षिततेच्या  कारणस्थव व पर्यटक व स्थानिक प्रवाश्याची संख्या घटल्या मुळे कर्जत-माथेरान मिनीबस सेवा बंद करण्यात आली होती. नेरळ माथेरान हा एकमेव रहदारीचा मार्ग असल्याने लॉकडाऊन काळात टेक्सि सेवेचा सीटअभावीचा दरही वाढला होता काही कामा निमित्ताने, शैक्षणिक गोष्टीसाठी जाण्यासाठीचा प्रवास खूपच महागडा व त्रासदायक ठरत होता, त्यामुळे मिनी बस सेवा सुरू होणे गरजेचे होते. सध्या कोरोनाच्या सर्व परिस्थिती बाबत विचार करून इतर ठिकाणीच्या बससेवा  हळूहळु सुरू होत आहेत, त्याच धर्तीवर  माथेरान च्या मिनी बस चे ही सुरू होण्याबाबत  कर्जत आगर प्रमुख  प्रयन्तशील होते, अशातच  स्थानिकांनी केलेल्या सततच्या मागणीचा विचार करत कर्जत आगाराने कर्जत-माथेरान मिनीबस सुरु करण्याचा निर्णय अखेर घेतला व आज पासून सुरू केली.माथेरानमधील  कोरोना परिस्थिती सुधारल्या नंतर नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, भाजपच्या शिष्टमंडळाने तर  मनसें अध्यक्ष संतोष कदम यांनी कर्जत आगारात जाऊन व्यवस्थापकांची भेट घेऊन मिनीबस लवकरात लवकर सुरु करण्यासंदर्भात निवेदने दिली होतीच , नुकताच पालकमंत्री अदिती तटकरे याचा माथेरान दौरा झाला तेव्हा माथेरान राष्ट्रवादी पक्षाचे माथेरान शहर अध्यक्ष अजय सावन्त यांनी बस सुरु करण्याबाबत पालकमंत्री अदिती तटकरे याना सांगितले होते, त्यामुळे  या सर्व आदेश आणि निवेदनाचा सकारात्मक विचार करत अखेर एसटी महामंडळाच्या कर्जत आगाराने आज सोमवार  21 जूनपासून मिनीबस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी प्रमाणे पहाटेची ६-१५ ची व दुपारी २-१५ ची फेऱ्या सध्या नसल्या तरी टप्याटप्याने बस फेऱ्या सुरळीत होतील, दिवसातून तीन फेर्‍या कर्जतहून तर तीन फेर्‍या माथेरानहून असणार आहेत. ही मिनीबस सुरु होत असल्यामुळे  सध्या निवडणुकांचे वारे वाहत असताना मिनी बसला ही राजकीय हवा  लागायला सुरवात झाली आहे माथेरान  सोशल मीडियावर श्रेयवादाचे घोडे दामटवायला सुरवात झाली असली तरी स्थानिकांमध्ये  मिनी बस बोलले की जो नेता, पक्ष नजरेत हृदयात येतो तोच   महत्वचा आहे, सध्या तरी श्रेयवादाच्या जुगलबदित बस सुरू होतेय ही आनंदाचे वातावरण आहे.

मिनिबस सुरु करा या बाबत माथेरानकरांनी प्रत्यक्षभेटून  निवेदने दिली होती. त्यानुसार आम्ही कर्जत- माथेरान  अशा तीन फेऱ्या सुरू केल्या आहेत या सेवेचा लाभ घेताना कोविडच्या नियमांचे पालन करावे. मास्क घालणे बंधनकारक आहे. 

शंकर यादव, व्यवस्थापक, कर्जत एसटी आगार

मिनीबस वेळापत्रक

  • कर्जतहून - सकाळी 8.15 वा.दुपारी 12 वा.सायंकाळी 4.45 वाजता
  • माथेरानहून - सकाळी 9.30 वा दुपारी 1 वा.सायंकाळी 6 वाजता

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies