…तोपर्यंत कोल्हापुरातील निर्बंध शिथील केले जाणार नाहीत.
भिमराव कांबळे -कोल्हापुर
कोल्हापूर - कोल्हापुरातील कोरोना रूग्णांची संख्या जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत सुरू असलेले निर्बंध अजिबात शिथील करणार नाही. याउलट नियम पाळले जात नसतील तर ते अधिक कडक करू असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. अजित पवार यांनी कोल्हापुरात कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
महाराष्ट्रातील सर्वात जास्त पॉझिटिव्हीचं प्रमाण कोल्हापुरात असल्यानं जिल्ह्यात चौथ्या स्तरातील निर्बंध लावण्यात आलेत. रूग्णसंख्या कमी होत नाही तोपर्यंत इथले निर्बंध अजिबात शिथील केले जाणार नाहीत असा इशारा यावेळी त्यांनी दिला. याउलट जर कोणी नियम पाळत नसतील तर ते अधिक कडक केले जातील असंही त्यांनी सांगितलं. कोल्हापूर लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावं यासाठी नागरिकांना थोडं सोसावं लागणार आहे. अनेकजण कोरोनाचे नियम पाळत नसल्याने ते आपलं आरोग्य धोक्यात घालत आहेत, परिणामी निष्पापांनाही याचा फटका बसतोय. म्हणूनच पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना या निर्बंधांची कडकपणे अमंलबजावणी करण्यास सांगितल्याचंही पवार यांनी यावेळी सांगितलं.