जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघुले वस्ती याची ब्लेस स्कूल म्हणून निवड
प्रियांका ढम- पुणे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघुले वस्ती येथे दिनांक 16 जून 2021 रोजी सेव द चिल्ड्रन संस्थेचे माननीय सहव्यवस्थापक हरीश वैद्य , तसेच सुप्रिया नलवडे आणि टीम यांनी भेट दिली. यावेळी शाळेत मुख्याध्यापिका अलोलिका अशोक गुरव,उपशिक्षिका पूनम सोमनाथ राव शिंदे आणि पालक उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्लेस स्कूल म्हणून निवडण्यात आली होती,त्याचे कामकाज पूर्ण झाल्यामुळे निरीक्षण करण्यासाठी वैद्य सर शाळेत आले होते. शाळेची बाह्यसजावट या संस्थेमार्फत करण्यात आली. हॅन्ड वॉश स्टेशन ,गोष्टींची पुस्तके, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्कूल बॅग वाटप इत्यादी विविध उपक्रम या संस्थेमार्फत शाळेत राबविण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी फुल, ग्रीटिंग देऊन त्यांचे स्वागत केले आणि त्यांची छोटीशी मुलाखत घेऊन आभार व्यक्त केले. गुरव मॅडम यांनी प्रास्ताविक मांडले शिंदे मॅडम यांनी कवितेच्या स्वरूपात आभार व्यक्त केले . हरीश वैद्य सरांनी शाळेविषयी चालू असलेल्या उपक्रमांविषयी उत्कृष्ट अभिप्राय दिला व पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.