पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलाचे लोकार्पण !
मार्केट यार्ड ते पुणे स्टेशन प्रवास होणार सुखकर
किशोर उकरंडे -पुणे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलाचं लोकार्पण आज पार पडलं. आपल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आणि खासदार श्री. गिरीशभाऊ बापट यांच्या उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले. डायस प्लॉट ते वखार महामंडळापर्यंत बांधलेल्या या उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार सुनील कांबळे, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक श्रीनाथ भामले, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते. या उड्डाणपुलामुळे मार्केट यार्ड ते पुणे स्टेशन तसेच हडपसरकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे.