Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

देगाव औद्योगिक वसाहती लगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के उठवण्यासाठी ना.अदिती तटकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा:आ.शशिकांत शिंदे

 देगाव औद्योगिक वसाहती लगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के उठवण्यासाठी ना.अदिती तटकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा:आ.शशिकांत शिंदे

प्रतीक मिसाळ -कोरेगाव



कोरेगाव मतदारसंघातील देगाव ता . सातारा येथील शेतकऱ्यांच्या सातबारावर ' महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ ' या औद्योगिक वसाहतीचे शिक्के असल्या कारणाने सदर शेतकऱ्यांना जमिनीसंबंधीत व्यवहार , बँक कर्ज व इतर आर्थिक व्यवहार करताना अडचणी येत आहेत . यातील काही शेतकरी अल्पभूधारक असल्याने हे शिक्के उठवण्याचा शब्द आमदारांनी ग्रामस्थांना दिला होता . याबाबत आज ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या दालनात बैठक संपन्न होऊन हे शिक्के उठविण्यासंदर्भात चर्चा झाली . 



सदर मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी मंत्री महोदयांनी दिले . बैठकीला आमदार शशिकांत शिंदे, देगाव ग्रामस्थ व औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies