मनसे तर्फे कोरोना योद्धा सन्मानपत्र वाटप
ज्ञानेश्वर बागडे-
महाराष्ट्र मिरर टीम
*
.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ-शेलू-वांगणी युनिटच्या वतीने कोविड-१९ विषाणूचा प्रसार वाढत असताना आपल्या *जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि. १४.०६.२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता नेरळ-शेलू-वांगणी युनिट मध्ये कोरोना योद्धा सन्मानपत्रक म. न. रे. का. सेना नेरळ-शेलु-वांगणी युनिट तर्फे देवुन गौरविण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना सहसचिव मुंबई विभाग मंगेश मोहन दळवी अध्यक्ष नेरळ-शेलू-वांगणी युनिट उदय संतोष मोडक खजिनदार जगदीश गोपाळ राणे सदस्य मनोहर म्हसे, मिलिंद पडवळ, विजय पाल प्रविण भवारे, मधुकर कडव महिला सदस्य रश्मी नरवणे, स्वाती बोडके, वनिता तरे, पुष्पा निरभवणे आदी कार्यक्रमात उपस्थित होते.
याप्रसंगी बदलापुर वाणिज्य विभागाचे मुख्य वाणिज्य निरिक्षक शिरीष कांबळे यांना कोरोना योद्धा सन्मानपत्रक देवुन गौरविण्यात आले सोबतच वाणिज्य विभाग, परिचालन विभाग, पिवे विभाग, विद्युत विभाग जि.आर.पी. , आर.पि.एफ आदी सर्व विभागातील कर्मचारी बंधु-भगिनी यांना कोरोना योद्धा सन्मानपत्रक देऊन गौरविण्यात आले .