Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

छत्रपती शाहू महाराजांनी दीनदलितांना न्याय व हक्क मिळवून दिला : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड येथे छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन 

 छत्रपती शाहू महाराजांनी दीनदलितांना न्याय व हक्क मिळवून दिला : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कुलदीप मोहिते- कराड



 


 सर्वसामान्यांना न्याय मिळावा समान हक्क मिळावा यासाठी समाजातील दीनदलितांना छत्रपती शाहू महाराजांनी बरोबर घेतले आणि त्यांना न्याय व हक्क मिळवून दिला अशी प्रतिक्रीया सहकार पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली . कराड येथील शाहू चौकात जनतेचे राजे , छत्रपती शाहू महाराज यांच्या 147 व्या जयंतीनिमित्त सहकार पणन तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे , तहसीलदार अमरदीप वाकडे , नगरपरिषदेचे आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर , नगरसेवक किरण पाटील , बाबा कळके , लालासाहेब पाटील , शिवाजी पवार , सतीश भोंगाळे , लालासाहेब देवकर व इतर शासकीय अधिकारी , मान्यवर उपस्थित होते . राज्यातील लोकशाही आघाडीचे सरकार छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे . मी तमाम जनतेच्यावतीने छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करतो असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies