Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

बालाजी गणेश मंडळ उंब्रजने राबवला खड्डे बुजवण्याचा उपक्रम

 बालाजी गणेश मंडळ उंब्रजने राबवला खड्डे  बुजवण्याचा उपक्रम

कुलदीप मोहिते -कराड



उंब्रज पाटण हा रस्ता वर्दळीचा आहे या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत हे खड्डे चुकवताना वाहनचालकांना अक्षरशा तारेवरची कसरत करावी लागत आहे सध्या अवकाळी पावसामुळे खड्ड्यात पाणी  साठले आहे पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकी किंवा तीन चाकी खड्ड्यात  आदळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि बांधकाम विभागाचे ही याच्याकडे लक्ष नाही  याच पार्श्वभूमीवर बालाजी  गणेश मंडळ उंब्रज मधील काही तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत  कोरोना महामारीच्या  पार्श्वभूमीवर  शासनाने घालून दिलेल्या  सर्व नियमांचे पालन करून मंगलमूर्ती गॅरेज समोर पाटण रोड वर पडलेले मोठ-मोठे  खड्डे  मुजवण्याचा   उपक्रम हाती घेतला  या उपक्रमामध्ये  संभाजी पवार  स्वप्निल साळुंके अवधूत अलटकर विश्वास पोरे संतोष थोरात वेदांत मोहिते अक्षय थोरात विशाल गाढवे शुभम थोरात अथर्व  अलटकर आदी उपस्थित होते निश्चितच बालाजी गणेश मंडळाचा हा उपक्रम कौतुकास पात्र आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies