झाड ठरलं देवदूत,वाचवले दोघांचे प्राण
आजवर याच झाडाने शेकडो वाचवले प्राण
गुरुनाथ साठेलकर-खोपोली
मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटातील मेकॅनिक पॉईंटच्या वरच्या बाजूच्या वळणावर मुंबईच्या दिशेने ( wrong side ) उतणाऱ्या वाहनावरचे चालकाचे नियंत्रण गेल्याने, बॅरिकेडिंग तोडून वाहन दरीत कोसळले. त्या ठिकाणी असलेल्या झाडामुळे वाहन खोल भागात कोसळू शकले नाही. त्यामुळे वाहन चालक आणि त्याच्या साथीदाराचा जीव वाचला.
आजवर याच झाडाने शेकडो प्राण वाचवले असून आणि कित्येक अपघातात धीरोदात्तपणे ते उभे होते. मात्र दुर्दैवाने ते आज धारातीर्थी पडले आहे.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा - बोरघाट तसेच बोरघाटातील मृत्युंजय देवदूत यांच्या मार्फत त्या झाडाला पुनः उभे करून पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाईल.