मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण मनसे चे सुरज लोहार यांचा उपक्रम
संदीप फडतरे- माण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वडूज ता खटाव येथील येरळा नदी परिसरात मनसे च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक सूरज लोहार नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात तसेच ते विविध उपक्रम राबवित असतात.कोरोना काळात येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण , नातेवाईक व ऑन ड्युटी पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांना मोफत नाश्त्याची सोय लोहार यांनी केली होती . यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वड , चिंच , पिंपळ बदाम , जांभूळ इ झाडाच्या प्रजातीची रोपे लावलेली आहेत . तसेच लावण्यात आलेली रोपे नियमित खत पाणी घालून जपणार असल्याचे ही सूरज यांनी या वेळी सांगितले . यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महेश देसाई, विशाल गोडसे ,सागर गोडसे, आदित्य लोहार आदी कार्यकर्ते उपस्थित होते .