माथेरानला धबाबा लोटले पर्यटक!
माथेरानकर व्यावसायिक सुखावले
चंद्रकांत सुतार--माथेरान
रायगड जिल्ह्यातील माथेरान हे सर्वात सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे येथील शुद्ध हवा आणि निसर्गरम्य सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर आणि राज्यातील विविध भागातील लोक माथेरानला भेट देतात. मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून माथेरान पर्यटकांसाठी बंद होता. व्यवसाय बंद त्यामुळे येथील जनता पुरती हतबल झाली होती,महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाव्हायरस प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लादले होते.सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनेक जिल्ह्यांमधील पर्यटन स्थळे व बाजारपेठा बंद ठेवण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र सरकारने पाच टप्प्यांत हे राज्य अनलॉक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक ठिकाणी पर्यटनस्थळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला
सर्व नियम व अटी लागू करुन माथेरान आता पर्यटनासाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. त्यामुळे इथे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक येण्यास सुरुवात झाल्याने दोन दिवस येथील हॉटेल ,लॉजीग, घोडे, हात रिक्षा,दुकानदार,छोटे मोठे व्यवसाया सुरू झाल्याने माथेरानकर मात्र सुखावला आहे, रायगड जिल्यातील कर्जत तालुक्यातील एक पर्यटन स्थळ माथेरान सुरू झाल्याने माथेरान बरोबरच, नेरळ टॅक्सी व्यवसाय माथेरानला येताना वाटेत असलेले छोटे मोठे रस्त्यात खाद्य व्यवसायिकांनाही आज माथेरान पर्यटन सुरू झाल्याने त्यांच्या हातालाही काम मिळून रोजीरोटी सुरू होईल अशी प्रतिक्रिया उमटत आहेत.