माणगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, लाखपालेसाठी मौजे लाखपाले येथील शासकीय जागा हस्तांतरित
महाराष्ट्र मिरर वृत्तसेवा-माणगांव
माणगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, लाखपाले या इमारतीच्या बांधकामासाठी जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिशः लक्ष घालून संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
या पार्श्वभूमीवर मौजे लाखपाले, ता.माणगाव जि. रायगड येथील 760 चौ.फूट जमीन महसूल मुक्त व सारमाफीने ही शासकीय जमीन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, लाखपाले करिता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या निर्देशानुसार हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत.
माणगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्वाची आहे.