उत्तर रायगड युवासेनेची आढावा बैठक चौक येथे संपन्न
कर्जत , खालापूर, उरण, पनवेल येथील युवासेना अधिकारी उपस्थित
नरेश कोळंबे-कर्जत
महविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यांच्या कार्याची सर्वांना योग्य माहिती मिळावी, तसेच पक्षाच्या वृद्धीसाठी काय करता येईल यासर्व गोष्टींसाठी उत्तर रायगड भागातील युवासेनेचे अधिकारी यांची वरुण सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली चौक येथे आढावा बैठक घेण्यात आली.
उत्तर रायगड युवासेनेची आढावा बैठक बुधवार दि.२३ रोजी दुपारी २ वाजता चौक फाटा येथील मोतीराम ठोंबरे यांच्या ऑफिस मध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला युवासेना सचिव, कॉलेज कक्षप्रमुख वरूण सरदेसाई, यांनी हजेरी लावत सर्व युवा प्रतिनिधींना समाजकार्याची ओढ घेत समाजासाठी काम करा असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिवसेना पक्ष हा राजकारण दूर सारून समाजकार्याला वाहिलेला पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे प्रत्येक तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचे आवाहन त्यांनी युवा प्रतिनिधींना केले.
बिटवीन द लाईन
- महाविकास आघाडीत मुख्यमंत्री यांचे काम चांगले ते लोकांपर्यंत पोहचवा
- शिवसेना हा पक्ष राजकारण बाजूला सारून समाजकार्य करणारा
- युवासेना पदाधिकारी यांनी तळागाळात जाऊन काम करावं.
त्यांच्यासोबत युवासेना सहसचिव योगेश निमसे, रायगड विस्तारक ओमकार चव्हाण, रायगड युवा अधिकारी मयुर जोशी, कर्जत खालापुर विधानसभा मतदारसंघातील विधानसभा अधिकारी संदिप बडेकर, विधानसभा सचिव प्रथमेश मोरे, कर्जत तालुका अधिकारी अमर मिसाळ , कर्जत तालुका सचिव अॅड संपत हडप, तर खालापुर मधील प्रशांत खांडेकर, महेश पाटील उरण येथील उरण विधानसभा मतदारसंघातील विधानसभा अधिकारी नितेश पाटील आणि पनवेल येथून पनवेल विधानसभा मतदारसंघातील नितीन पाटिल, अवचित राऊत ,पराग मोहिते तसेच उत्तर रायगड मधील प्रमुख सर्व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.