Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये २६ जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच

मुंबई- पुणे मार्गावर विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनमध्ये 26 जूनपासून प्रथमच व्हिस्टाडोम कोच

  • मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस विशेष सेवा 26 जूनपासून पूर्ववत
  • पश्चिम घाटावरील नदी, खोरे, धबधबे यांच्या अविरक्षित दृश्यांचा प्रवासी आनंद घेऊ शकतात

महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई



रेल्वेने मुंबई - पुणे विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनच्या सेवा व्हिस्टाडोम कोचसह दि. २६.६.२०२१ पासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.  या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे. 

मुंबई- गोवा मार्गावरील प्रवाशांना उपलब्ध असलेले व्हिस्टाडोम कोचमधील प्रवास करतानाचे पश्चिम घाटाचे अनुभव आता मुंबई-पुणे मार्गावरही उपलब्ध होतील.  सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई -मडगाव जन शताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. आता मुंबई- पुणे मार्गावरील प्रवासी येथून जातांना जवळच्या माथेरान टेकडी (नेरळ जवळील), सोनगीर टेकडी (पळसधरी जवळील), उल्हास नदी (जांबरूंग जवळील), उल्हास व्हॅली, खंडाळा परिसर इ. चा आणि लोणावळा आणि दक्षिण पूर्व घाट विभागातील बोगदे आणि धबधबे या  निसर्गरम्य सौंदर्याचा व अनुभवाचा आनंद घेऊ शकतात. विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या इ. समावेश आहे.



01007 विशेष डेक्कन एक्स्प्रेस दि. २६.६.२०२१ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  दररोज ०७.०० वाजता सुटेल आणि   त्याच दिवशी ११.०५ वाजता पुण्याला पोहोचेल.

 01008 डेक्कन एक्स्प्रेस विशेष दि. २६.६.२०२१ पासून दररोज १५.१५ वाजता पुण्याहून सुटेल आणि  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १९.०५ वाजता पोहोचेल.  



  •  
  • थांबे 
  • दादर, ठाणे, कल्याण, नेरळ (केवळ 01007 साठी), लोणावळा, तळेगाव, खडकी आणि शिवाजी नगर.  
  • संरचना
  • एक व्हिस्टा डोम, ३ वातानुकूलित चेअर कार, १० द्वितीय आसन श्रेणी, १ गार्ड ब्रेक व्हॅनसह द्वितीय आसन श्रेणी.   
  • आरक्षण
  • 01007 व 01008 या विशेष ट्रेनचे सामान्य शुल्कासह बुकिंग सर्व पीआरएस केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. २४.६.२०२१ रोजी सुरू होईल.  


केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.  

प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल. 

  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies