Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आमदार राजू पाटील यांच्या हस्ते मनसेच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

 आमदार राजू पाटील यांच्या हस्ते मनसेच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

स्वयंमचलित सौर दिव्यांचेही केलं लोकार्पण

ज्ञानेश्वर बागडे-

महाराष्ट्र मिरर टीम

https://youtu.be/zPDtqcweUGk


 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  रायगड जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच राज्य महामार्गावर डिकसळ ते उमरोली येथे बसवण्यात आलेल्या स्वयंमचलित सौर दिव्यांचा लोकार्पण सोहला नुकताच आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. करोना परिस्थितीत नैसर्गिक वादळे व आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील  स्वतःच्या जीवाची परवा न करता वेळोवेळी समाजात घडणाऱ्या गोष्टी जनतेसमोर आणल्याबद्दल सर्व पत्रकारांचा सन्मान यावेळी आमदार राजू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार राजू पाटील हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,कर्जत नगरपालिकेत जरी आमचा एकच नगरसेवक असला तरी पुढे आमचा नगराध्यक्ष बसेल कारण कोविड काळात मनसेने पुढे येऊन जनतेत उतरून काम केले आहे ,त्यामुळे लोक मनसेला मदत करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.



जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या हस्ते आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.आमदार राजू पाटील कर्जतला येणार म्हणून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुलले पाहायला मिळालं.यावेळी कर्जत,खालापूर,नेरळ येथील मनसेचे कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies