पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते लसीकरणाच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण
- दुर्गम भागातील नागरिकांचे होणार लसीकरण
प्रतीक मिसाळ सातारा
जिव्हिका हेल्थ केअरकडून लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले , जिल्हाधिकारी शेखर सिंह , मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा , पोलीस अधीक्षक अयजकुमार बन्सल , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते , कृषी सभापती मंगेश धुमाळ , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते . लसीकरणासाठी प्राप्त झालेल्या दोन रुग्णवाहिकांच्या माध्यमातून गावापासून दूर असलेल्या तसेच दुर्गम भागातील , वाड्यावस्त्यावर ही रुग्णवाहिका जाणार असून येथील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे . यासाठी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना दिशा निर्देश देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले .