जिल्ह्यात पावसाचा जोर कमी ; अद्याप ५५ बंधारे पाण्याखाली
भिमराव कांबळे -कोल्हापुर
गेल्या दोन-तीन दिवस जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्यानंतर आज थोडी उसंत घेतली. तरीदेखील पंचगंगेच्या पाणी पातळीतमात्र वाढ झाली आहे. आज सायंकाळी ७ वाजता राजाराम बंधारा इथं पाणी पातळी ३३ फूट ५ इंचावर पोहचली होती.
दिवसभर अधून मधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्या पाठोपाठ चंदगड तालुक्यात ७५.४० मिलिमीटर, गगनबावडा तालुक्यात ६८.८० मिलिमीटर, राधानगरी तालुक्यात ६५.७० मिलिमीटर, शिरोळ तालुक्यात ३६.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वात कमी हातकणंगले तालुक्यात १६.३० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. आज सायकाळी ७ वाजेपर्यंत तीन बंधाऱ्यावरील पाणी कमी झालं आहे. मात्र अद्याप जिल्ह्यातील एकूण ५५ बंधारे पाण्याखाली आहेत.तसेच चार राज्यमार्ग आणि 10 जिल्हा मार्ग अजूनही पाण्याखालीच आहेत.