अखेर 'तो' फलक हटवल्यानं सोशल मीडियावरील चर्चेला पूर्णविराम..
भिमराव कांबळे -कोल्हापुर
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मिडियावर चालू असलेल्या तावडे हॉटेल परिसरातील स्वागत कमानींवरील खाजगी संस्थेच्या फलकासंदर्भातील चर्चेला आज पूर्णविराम मिळाला.
कोल्हापुर शहरात प्रवेश करताना तावडे हॉटेलपरिसरात असणाऱ्या स्वागत कमानींवर एका खाजगी संस्थेचा जाहिरात फलक लावण्यात आला होता. ही जाहिरात काढून टाकावी असे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मागणी केली जात होती. याबाबत शहरातील काही सामाजिक संघटनांनी 'सदरचा फलक हटवा अन्यथा आंदोलन छेडू' असा इशारा देखील दिला होता. याची दाखल घेत आज सकाळीच महापालिकेने हा जाहिरातीचा फलक काढला. त्यानंतर दुपारी शिवसेनेकडून याच स्वागत कमानीवर 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर', 'करवीर नगरीत सहर्ष स्वागत' असा फलक लावून सोशल मीडियावरील चर्चेला पूर्णविराम दिला.