Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रायगड,रत्नागिरी जिल्ह्याना जोडणाऱ्या आंबेत पुलाच्या नूतनीकरण बांधकामाची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी,

 रायगड,रत्नागिरी जिल्ह्याना जोडणाऱ्या आंबेत पुलाच्या नूतनीकरण बांधकामाची पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली पाहणी,

  • पुढील पाच दिवसांत पुल प्रवासाठी खुला होणार असल्याचे दिले संकेत.

अरुण जंगम
महाराष्ट्र मिरर टीम-म्हसळा 



रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आणि मुख्य करून दक्षिण कोकणातील मुख्य प्रवेशद्वार असलेला सावित्री नदीवरील आंबेत पुलाची डागडुजी कामाची आज पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पहाणी केली.पुलाचे नुतनीकरण करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आसुन तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर या पुलावरून आता प्रवासी वर्गासाठी खुला करण्यात येणार असल्याचे संकेत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पहाणी केल्या नंतर दिले आहेत.येत्या 26 तारखेला या पुलावरील प्रवासाचा पहिला ट्रायल घेऊन आणि नवीन बांधकामा बाबत इतर सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी पाहणी दरम्यान माहिती देताना सांगितले.डागडुजी करण्यात आलेल्या आंबेत सावित्री पुलाची  मर्यादा ही किमान पुढील पंधरा वर्षे टिकणारी असल्याचे सनरचना कन्स्ट्रक्शन आणि बांधकाम विभागाचे अधिकारी वर्गाने माहिती देताना सांगितले.कोकणातील मुख्यतः मंडणगड,दापोली,खेड या तीन तालुक्यांना जोडणारा आणि पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणारा मार्ग ओळखला जातो.पुलाचे नूतनीकरण पुर्ण झाले असल्याने आता प्रवाशी वर्गासहित सर्व त्या रहदारीसाठी अधिक चालना मिळणार आहे.



पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आंबेत पुल बांधकामाची पाहणी व अधिक माहिती घेते वेळी त्यांच्या समवेत दापोली मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम,म्हसळा सभापती छाया म्हात्रे,उपसभापती संदीप चाचले,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बामणे,श्री राऊत,सनरचना कंपनीचे मॅनेजर जोशी,सामाजिक कार्यकर्ते नाविदभाई अंतुले,पाभरे सरपंच अनिल बसवत,संदेरी सरपंच फारुख हजवाने आदी पदाधिकारी उपस्थित होते.रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा आंबेत पुल कमी अंतराचा,पर्यटनाच्या आणि सर्वच प्रकारच्या रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्याने भविष्यात नवीन पुलाचे काम हाती घेतले जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुलाचे बांधकामाची पहाणी करताना दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies