Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सातवीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गरोदर अल्पवयीन चुलत भावासह दोघांवर गुन्हा दाखल

 धक्कदायक घटना :

 सातवीमध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी सात महिन्यांची गरोदर 

अल्पवयीन चुलत भावासह दोघांवर गुन्हा दाखल

संदीप फडतरे- माण



माण तालुक्यातील सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे . यामध्ये अल्पवयीन चुलत भाऊ आणि एकावर दहिवडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा  दाखल करण्यात आला आहे .

सातारा जिल्ह्याला हादरवून टाकणारी घटना मंगळवारी रात्री उशिरा उघडकीस आली आहे . जिल्ह्यातील माण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी सातवीमध्ये शिक्षण घेत असून ती सात महिन्याची गर्भवती असल्याची बाब समोर आली आहे . यामधील धक्कादायक प्रकार म्हणजे अत्याचार करणाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलीच्या चुलत भावाचा देखील समावेश असून दुसरा संशयितांचे 19 वय आहे . मुलीच्या आईने दोघांवर दहिवडी पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून अल्पवयीन चुलत भावासह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies