इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२२ मधे अवघ्या १ वर्ष १० महिने असलेल्या गार्गीचे नाव ....!
प्रियांका ढम- पुणे
"खरंतर ह्या सर्व गोष्टी ती दीड वर्षांची असतानाच करत होती..परंतु काही कौटुंबिक अडचणीमुळे माझ्याकडून अर्ज करण्यास विलंब झाला होता असे तिची आई सांगते!"
मुलांना मारून मुटकून अभ्यास करून घेणे खरंतर मला फारसे आवडत नाही..माझ्या मते मुलांना त्यांचं बालपण जगू द्यावं आणि म्हणूनच मी तिला फार लवकर शाळेत घालण्याची घाई करणार नाही..असच खेळता खेळता खाता ,पिता आम्ही तिला सगळं शिकवतो आणि ती ते सगळं लक्षात ठेवते असे महाराष्ट्र मिरर टीमशी संवाद साधताना गार्गीच्या आई वडिलांनी सांगितले.
ह्या यशामध्ये तिच्या आई पप्पांसोबत आजी आजोबांचा पण मोलाचा वाटा आहे.तिला श्लोक शिकवणे,सकाळी उठल्यावर प्रारंभी विनंती, संध्याकाळी शुभंकरोती , संध्याकाळचे श्लोक चांगल्या सवयी लावणे हे त्यांचेच श्रेय आहे असे गार्गीच्या मम्मीने 'महाराष्ट्र मिरर'शी बोलताना सांगितले .