गावच्या मुलांना सामाजिक कार्याची ओढ-अनिल शेळके
सुधीर पाटील- सांगली
सावित्री आणि यमाचा संवाद ज्या वृक्षाखाली झाला त्यामध्ये सावित्रीने यमाकडून तीन गोष्टी मागून घेतल्या पहिली गोष्ट अंध सासर्याला दृष्टी प्राप्त व्हावी दुसरी गोष्ट सासऱ्याचा गेलेलं वैभव परत मिळावे ,तिसरी गोष्ट सत्यवानाचा वंश वाढावा आणि त्या दिवसापासूनच महिला वडाच्या झाडाची पूजा करतात व आपल्या पतीला दीर्घा आयुष्य लाभावे यासाठी मनोकामना करूण वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमेची औचित्य साधून निमणी गावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल शेळके यांनी वडाचे झाडे लावण्याचा संकल्प केला .व तो पूर्णत्वास नेला एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. निसर्गाचे संतुलन बिघडत आहे .याही गोष्टीचा जाणीवपूर्वक विचार करून झाडे लावण्याचा संकल्प केला जात आहे .या कामांमधे गावांतील अनेक तरुण कार्यकर्ते सक्रिय होताना दिसत आहेत . किंबहुना त्यामुळेच आमच्या गावातील तरुणांना सामाजिक कार्याचे वेडआहे असे उद्गगार सामाजिक कार्यकर्ते अनिल शेळके यांनी काढले . वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी संतोष राजमाने पाटील, सुधीर पाटील, प्रवीण राजमाने ,अक्षय कोळी ,सुमित घोडके ,आदित्य राजमाने ,शुभम कोळी ,संदीप साळुंखे,राहुल पाटील ,विकी कोळी आदी तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.