Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

विद्यार्थ्यांच्या राहण्याची गैरसोय टाळण्यासाठी वसतिगृह च्या कामासाठी आग्रही राहणार: आ.शशिकांत शिंदे

 विद्यार्थ्यांच्या राहण्याची गैरसोय टाळण्यासाठी वसतिगृह च्या कामासाठी आग्रही राहणार: आ.शशिकांत शिंदे

प्रतीक मिसाळ कोरेगाव



सातारा शहरामध्ये इंजिनिअरिंग , फार्मसी , आयटीआय इत्यादींसारखी विविध महाविद्यालये असून लवकरच वैद्यकीय महाविद्यालयही सुरू होणार आहे . या महाविद्यालयांत शिकण्यासाठी सातारा व इतर जिल्ह्यातून दरवर्षी हजारो विद्यार्थी शहरात येत असतात . मात्र येथे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची सोय उपलब्ध नसल्या कारणाने विद्यार्थ्यांची गैरसोय निर्माण होत आहे . हीच गोष्ट लक्षात घेऊन आज मंत्री ना . नवाब मलिक साहेबांच्या दलनामध्ये त्यांची भेट घेऊन सातारा शहरात विद्यार्थ्यांसाठी लवकरात लवकर वसतिगृह मंजूर करावे अशी शिफारस तसेच आग्रही मागणी करण्यात आली . याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होऊन विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतिगृह बांधण्यात येईल. असे आ.शशिकांत शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. वसतिगृहचे काम लवकर होऊन विद्यार्थ्यांनची गैरसोय टळणार असल्याने विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. तसेच या कामासाठी आमदारांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे विद्यार्थ्यांच्या वतीने पंकज मिसाळ, राष्ट्रवादी युवक चे गोरखनाथ नलावडे,महेश फडतरे, शैलेश वाघमारे, संदीप फडतरे ,राम सुळके आदिंनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies