झाशीची राणी रणरागिनी पुरस्काराने स्मिता गायकवाड़ सन्मानित
मिलिंद लोहार-पुणे
हिंदवी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, अतिशय प्रामाणिक, कुशल संघटक, युवकांचे प्रेरणास्थान अभिजीत बोराटे यांच्या संघटनेच्या 13व्या वर्धपणादिनानिमित्त स्मितसेवा फौंडेशन संस्थापक अध्यक्षा सौ स्मिता तुषार गायकवाड यांना त्यांनी केलेल्या सामाजिक व विविध क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल झाशीची राणी रणरागिनी हा पुरस्कार देण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश योगेश आण्णा टिळेकर, सहपोलीस आयुक्त सर्जेराव बाबर , नगरसेवक - रंजनताई टिळेकर , मारुती आबा तुपे, उज्वलाताई जंगले, प्राचीताई आल्हाट, पोलीस निरीक्षक अडागळे सर, जीवन जाधव, महेश ससाणे, धनंजय गवळी, के. टी. आरु, विकास भुजबळ, अमित गायकवाड, अजय न्हावले, तुषार गायकवाड, सोनलताई कोद्रे, सविताताई हिंगणे,अश्विनी सूर्यवंशी, मंगलताई रायकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच नूतन पासलकर, संगीता पाटील, रुपाली पाटील, सुनीता पाटील, संगीता बोराटे, अपर्णा बाजारमठ, ललिता चिल्लार, कु. आरती यादव, अनिता हिंगणे, राणी सिंग, वैशाली विभूते, सौ सुजाता शेडगे इतर महिला पदाधिकारी व स्मितसेवा फौंडेशन सदस्या यांचा सहवास लाभला.